श्री. छगन भुजबळ

माननीय पालकमंत्री नाशिक

महसूल विभाग जिल्हाधिकारी नाशिक कार्यालया मार्फत स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे. जास्तीत जास्त जनतेला ह्याचा लाभ होईल आणि प्रशासन हा सेवा देण्यामध्ये तत्पर राहील ह्याची मला खात्री आहे.

श्री. गंगाथरण डी भा.प्र.से.

जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी नाशिक

प्रशासन पारदर्शक व गतिमान करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने सेवा हक्क अधिनियम हा कायदा २१ ऑगस्ट २०१५ ला अधिसूचित करण्यात आला. त्या मध्ये महसूल विभागाच्या २० सेवा ह्या लोकाभिमुख कायद्यात समाविष्ठ करण्यात आल्या व सदर सेवा सद्या राज्यभर ऑनलाईन प्रणालीने देण्यात येत आहेत.

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाने दि २६ जानेवारी २०२० रोजी २० सेवांव्यतिरिक्त ८१ सेवा नव्याने अधिसूचित केल्या व जनतेला सेवा मुदतीमध्ये देण्याची व्याप्ती अधिक वाढवली. आज आपण एक पाऊल आजून पुढे टाकत आहोत. ८१ नव्याने अधिसूचित सेवांपैकी पहिल्या टप्यात ५ सेवा ऑनलाईन पद्धतीने देण्याचे nashikmitra.in चे आज लोकार्पण करीत आहोत.

ह्या शिवाय जन सामान्यांना आपले अर्ज, तक्रार किंवा निवेदन ऑनलाईन रित्या देण्यासाठी तसेच जिल्हा स्तरावरील लोकशाही दिन व आपल्या अर्जाची स्थिती तपासणे हे nashikmitra.in च्या माध्यमातून लोकार्पण होत आहे.

अपेक्षा आहे कि जास्तीत जास्त लोकांना व जन सामान्यांना ह्या सेवांचा लाभ मिळेल, प्रशासन आजून पारदर्शक रित्या चालेल आणि अधिक गतिमान होईल...

सेवा हक्क ...
तुमचा अधिकार

अर्जाची स्थिती तपासा

तक्रार निवारण

मतदार यादीत दुबार नाव असलेबाबत जाहीर आवाहन

Copyright © 2021 Nashik Mitra, All Rights Reserved.

Total Visitor 0